मुंबई, (निसार अली) : लॉकडाऊन काळात गरिब-गरजू कुटुंबांची उपासमार होऊ नये, यासाठी संत नामदेव परिषदेच्याच्या वतीने मदत करण्यात आली. कल्याण येथील सामाजिक कार्यकर्ते व संत नामदेव परिषद दिल्ली महाराष्ट्र कोकण प्रांत अध्यक्ष रवींद्र कालेकर यांच्या पुढाकाराने व किरण कालेकर व आनंद सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले गेले.
कल्याण येथील अनेक गरजू व गरीब कुटुंबांची सध्या सुरू असलेल्या लॉक डाउनच्या काळात उपासमार होऊ नये म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले. सध्या शासनाच्या वतीने रेशनिंगवर तांदूळ, गहू देण्यात येत असल्याने या वस्तू न देता आम्ही तूरडाळ,मुगडाळ,तेल,साखर,चहा पावडर,मीठ,हळद व तिखट या वस्तू वाटण्यास प्राधान्य दिल्याचे रवींद्र कालेकर यांनी सांगितले.