मुंबई : अर्चना नेवरेकर फाउंडेशन प्रस्तुत संस्कृती कलादर्पण गौरव रजनी २०१७ हा चित्र-नाट्य पुरस्कार सोहळा नुकताच जोगेश्वरी येथील कमल अमरोही स्टुडिओमध्ये दिमाखात पार पडला. यात ‘कोडमंत्र’ या नाटकाने, तर ‘व्हेंटीलेटर’ या चित्रपटाने बाजी मारली. दरम्यान, या सोहळ्यानिमित्त ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांना संस्कृती कलादर्पणचा सर्वश्रेष्ठ कलागौरव या पुरस्काराने गौरविण्यात आले.
हा पुरस्कार माझ्यासाठी खूप खास असून, जीवन गौरव म्हणून मला मिळालेला हा पहिलाच पुरस्कार आहे, असे विजय चव्हाण यांनी सांगितले. ‘या पुरस्कारासाठी माझा विचार केल्याबद्दल धन्यवाद. संस्कृती कलादर्पणचा हा पुरस्कार मिळाल्यानंतर आणखीन नऊ जीवनगौरव पुरस्कार घेणार आणि निवृत्त होणार’ असा विनोद करत कार्यक्रमात जन आणली. तसेच रसिकांनी दिलेल्या अमाप प्रेमाबद्दल त्यांनी प्रेक्षकांचे आभार देखील मानले.
संस्कृती कलादर्पण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे व अध्यक्षा अर्चना नेवरेकर , स्मिता जयकर यांच्या हस्ते विजय चव्हाण यांचा गौरव करण्यात आला.
चिन्मय उदगीरकर आणि तितिक्षा तावडे या दोघांच्या खुमासदार सुत्रासंचालाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मालिका आणि चित्रपटांवर रंगलेल्या त्यांच्या जुगलबंदीवर उपस्थित पाहुण्यांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला. संस्कृती कलादर्पण गौरव रजनी २०१७ च्या या वर्षी नाटक-चित्रपट आणि मालिका तसेच लघुचित्रपट अशा चार वेगवेगळ्या विभागात पुरस्कार देण्यात आले. त्यातील नाटक विभागात कोडमंत्र, चित्रपट विभागात व्हेंटीलेटर तसेच मालिका विभागात ‘सरस्वती’ आणि ‘दुहेरी’ या मालिकांनी सर्वोत्कृष्ट होण्याचा मान मिळवला. शिवाय यावर्षी लघुचित्रपटासाठी पहिल्यांदाच झालेल्या स्पर्धेमध्ये ‘प्रदोष’ डी अंडर कव्हर गणेशा’ या लघुचित्रपटाने पहिले स्थान पटकावले. नाटक विभागातील सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना लेखक, सहाय्यक अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता अशा चार पुरस्कारांवर ‘तीन पायाची शर्यत’ या नाटकाने आपले नाव कोरले. त्यानंतर ‘, ‘ह्या गोजिरवाण्या घरात’, ‘छडा’ या नाटकांनी देखील विविध विभागातून पुरस्कारांवर मोहर उमटवली. तसेच नाटक विभागामध्ये सर्वोत्कृष्ट लक्षवेधी म्हणून लीना भागवत (के दिल अभी भरा नही) आणि शरद पोंक्षे (हे राम नथुराम) यांचा सन्मान करण्यात आला.
चित्रपट विभागात लोकांच्या पसंतीला उतरलेल्या ‘व्हेंटीलेटर’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट पटकथा, दिग्दर्शक, खलनायक, सहाय्यक अभिनेता तसेच अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट अशा ६ पुरस्कारांवर आपले नाव कोरले. चित्रपट विभागातील विविध पुरस्कारांसाठी ‘कासव’ या चित्रपटाला विशेष लक्षवेधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच ‘दशक्रिया’ या चित्रपटाला विशेष ज्युरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मालिका विभागात नीलकांती पाटेकर आणि सुलेखा तळवलकर यांना विभागून सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीने पुरस्कृत करण्यात आले. ‘सरस्वती’ आणि ‘दुहेरी’ या दोन मालिकांनी सर्वोत्कृष्ट होण्याचा मान पटकावला असून, तितिक्षा तावडे आणि उपेंद्र लिमये या कलाकारांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि अभिनेत्याचा मान पटकावला. तसेच अवधूत पुरोहित यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून सन्मानित करण्यात आले.
संस्कृती कलादर्पण रजनी २०१७ नाट्य आणि चित्रपट पुरस्काराचे हे १७ वे वर्ष अनेक बाबींने विशेष ठरले. यावर्षी वृत्तवाहिनी विभागात महाराष्ट्र टाइम्सच्या महिला पत्रकार कल्पना राणे यांना पत्रकारितेचा घोषित पुरस्कार जाहीर झाला, तसेच ए बी पी माझा या वृत्तवाहिनीला सर्वोत्कृष्ट वृत्तवाहिनीचा पुरस्कार बहाल करण्यात आला असून, ए.बी.पी.माझाचे अमित भंडारी यांना सर्वोत्कृष्ट पुरुष सूत्रधार आणि टीव्ही ९ च्या प्रेरणा जंगमला सर्वोत्कृष्ट स्त्री सूत्रधार पुरस्काराने नावाजण्यात आले. तसेच कथा बाह्य कार्यक्रम म्हणून चावडीला विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गेली १७ वर्षे होत असलेल्या सोहळ्याचा थाट यंदाही कायम होता. कलावंतांच्या धमाल परफॉर्मन्समुळे सोहळ्याला चारचाँद लागले. त्यातील सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक यांच्या नृत्याविष्काराने रसिक मंत्रमुग्ध झालेला दिसून आला.
नाटक विभाग
सर्वोत्कृष्ट नेपथ्य
१) प्रसाद वालावलकर – कोडमंत्र
सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना
१) भुषण देसाई – तीन पायांची शर्यत
सर्वोत्कृष्ट संगीत
१) अशोक पत्की – साखर खालेल्ला माणूस
सर्वोत्कृष्ट लेखक
१) अभिजित गुरु – तीन पायांची शर्यत
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
१) राजेश जोशी – कोडमंत्र
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
१) सुप्रिया पाठारे – या गोजिरवाण्या घरात
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
१) लोकेश गुप्ते – तीन पायांची शर्यत
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
१) मुक्ता बर्वे – कोडमंत्र
सर्वोत्कृष्ट अभिनेता विभागून
१) सौरभ गोखले – छडा
२) संजय नार्वेकर – तीन पायांची शर्यत
सर्वोत्कृष्ट लक्षवेधी अभिनेत्री
१) लीना भागवत – के दिल अभी भरा नही
सर्वोत्कृष्ट लक्षवेधी अभिनेता
१) शरद पोंक्षे – हे राम नथुराम
सर्वोत्कृष्ट नाटक
१) कोडमंत्र- अनामिका रसिका निर्मित
चित्रपट विभाग
सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक
१) दत्ता लोंढे, किम टायगर- नातीखेळ
सर्वोत्कृष्ट संकलन
१) रामेश्वर भगत – व्हेंटिलेटर
सर्वोत्कृष्ट छायांकन विभागून
१) संजय मेमाणे – हाफ तिकिट
२) धनंजय कुलकर्णी – कासव
सर्वोत्कृष्ट रंगभूषा
१) संतोष गायके – हाफ तिकिट
सर्वोत्कृष्ट संगीत
१) अमितराज- पोस्टर गर्ल
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका
१) आनंदी जोशी (एक सोहळा निराळा –फॅमिली कट्टा )
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक
१) आदर्श शिंदे (आवाज वाढव – पोस्टर गर्ल)
सर्वोत्कृष्ट गीतरचना विभागून
१) सुनील सुकथनकर – कासव
२) संजय कृष्णाजी पाटील – दशक्रिया
सर्वोत्कृष्ट संवाद
१) सुमित्रा भावे – कासव
सर्वोत्कृष्ट पटकथा
१) राजेश म्हापुसकर – व्हेंटिलेटर
सर्वोत्कृष्ट कथा
१) राजन खान – नातीखेळ
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
१) राजेश म्हापुसकर – व्हेंटिलेटर
सर्वोत्कृष्ट बालकलाकार विभागून
१) शुभम मोरे – हाफ तिकीट
२) आर्य आढाव – दशक्रिया
३) विनायक पोतदार – हाफ तिकीट
सर्वोत्कृष्ट खलनायक
१) निलेश दिवेकर – व्हेंटिलेटर
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
१) सई ताम्हणकर – फॅमिली कट्टा
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
१) आशुतोष गोवारीकर – व्हेंटिलेटर
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री विभागून
१) प्रियंका बोस-कामत (हाफ तिकीट)
२) सोनाली कुलकर्णी (पोस्टर गर्ल)
सर्वोत्कृष्ट अभिनेता विभागून
१) सुहास पळशीकर – माचीवरला बुधा
२) जितेंद्र जोशी – व्हेंटिलेटर
सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट विभागून
१) किरण कुलकर्णी vs किरण कुलकर्णी – ओम प्रॉडक्शन
२) कालचक्र – सेटलाईट पिक्चर्स
विशेष ज्युरी पुरस्कार
१) दशक्रिया – रंगनील क्रिएशन
विशेष लक्षवेधी चित्रपट
१) कासव – विचित्र निर्मिती
सर्वोत्कृष्ट चित्रपट
व्हेंटिलेटर- पर्पल पेबल पिक्चर्स प्रा.लि.
मालिका विभाग
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री विभागून
१) निलकांती पाटेकर (गोठ – स्टार प्रवाह)
२) सुलेखा तळवलकर (सरस्वती – कलर्स)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता विभागून
१) शेखर फडके (सरस्वती – कलर्स)
२) आंनद काळे (तुझ्यावाचून करमेना -कलर्स)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
१) तितिक्षा तावडे (सरस्वती – कलर्स)
सर्वोत्कृष्ट अभिनेता
१) उपेंद्र लीमये (नकुशी – स्टार प्रवाह)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
१) अवधुत पुरोहित (सरस्वती- कलर्स)
लक्षवेधी मालिका विभागून
१) दर्शन – ( पर्पल पॅच मिडीया – कलर्स)
२) नकुशी तरी हवी हवीशी ( सुमित प्रॉडक्शन- स्टार प्रवाह)
सर्वोत्कृष्ट मालिका
१) सरस्वती (मिडीया मोक्स – कलर्स)
२) दुहेरी (ड्रीमिंग 24 सेवन- स्टार प्रवाह )
न्यूज चॅनेल विभाग
सर्वोत्कृष्ट स्त्री सुत्रधार
१) प्रेरणा जंगम – टि.व्ही ९
सर्वोत्कृष्ट पुरुष सुत्रधार
१) अमित भंडारी – ए.बी.पी. माझा
कथाबाह्य कार्यक्रम
१) चावडी – विशाल पाटील (टि.व्ही ९)
सर्वोत्कृष्ट न्युज चॅनेल
१) ए.बी.पी. माझा
पत्रकारिता पुरस्कार (घोषित)
१) कल्पना राणे – महाराष्ट्र टाईम्स
कलागौरव पुरस्कार
१) ज्येष्ठ अभिनेते – विजय चव्हाण
पुरस्कार सोहळा क्षणचित्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा