मुंबई, (निसार अली) : मालवणीमधील सेंट mathew’s शाळेतील 800 गरजू विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना इनर व्हील क्लब,बॉम्बे क्वीन्स नेकलेस च्या सहकार्याने अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. तसेच दररोज 700 कुटुंबियांना दोन वेळचे भोजन कम्युनिटी किचनच्या माध्यमातून पुरविण्यात येत आहे. अध्यक्षा भावना मेहता यांनी पुढाकार घेतला आहे.
मालवणीतील आजमी नागर मधील विद्यार्थ्यांच्या गरजू कुटुंबियांना प्रत्येकी 17 किलो असे किमान महीनाभर पुरेल इतके अन्नधान्य वाटप केले गेले आहे. डॉ. दीवानगी वखारिया, स्मिता शाह यांनी लॉक डाउनच्या काळात थेट सिल्व्हासा येथून पीपीई कीटस मागवून मुंबईमधील टाटा रुग्णालय, सायन रुग्णालय, वाडिया आणि कूपर रुग्णालयातील आरोग्य कर्मचार्यांना दिले. अंजू सिराज व आकांक्षा यांच्या पुढाकराने के.जे. सोमैया रुग्णालयाला वेंटिलेटर निशुल्क उपलब्ध करून दिले.
समाजाने जे आपल्याला दिले आहे ते आपल्यावर समाजाचे कर्ज आहे. याची जाणीव ठेवून मालवणीतील सेंट mathew’s शाळेतील गरजू विद्यार्थी असो, कुटुंबिय असो, सर्वांच्या मदतीसाठी ही सर्व लोक पुढे असतात. जिथे जिथे गरज भासते तिथे ही मंडळी मदतीला धावतात, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका लार्जि व्हर्गिस यांनी दिली.