मुंबई : कॉंग्रेसचा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारली आणि पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठीकडें सादर केला. तसेच ज्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली. निरुपम यांनी पत्रकार परिषद घेत अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहोत, असे जाहीर केले.
दरम्यान, कॉंग्रेसमध्ये गुरुदास कामत आणि निरुपम गटातील वाद ऐन निवडणुकीत उफाळून आला होता. वरिष्ठ पातळीवरील नेत्यांना देखील हा वाद मिटवता आला नाही. याचा फटका पालिका निवडणुकीत पक्षाला फटका बसला. पालिकेत स्वबळावर येण्याची संधी असूनही प्रचारात कमी पडल्याने कॉंग्रेसला अवघ्या ३१ जागा मिळाल्या.