
२१ वे शतक म्हणजे स्पर्धेचे शतक. या शतकातील जीवघेण्या स्पर्धेत टिकायचे असेल तर पारंपारिक शिक्षणापेक्षा व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्यावर आधारित शिक्षणाशिवाय पर्याय नाही.
सध्याच्या कोविडोत्तर काळात शिक्षणाची व्याख्या कालसापेक्ष बदलली आहे . पूर्वी शिक्षण करिअर केंद्रित होते पण आता सुरक्षित भविष्यासाठी शिक्षण असा त्याचा क्रम बदलला आहे. त्यामुळे काळाची बदलती पाऊले लक्षात घेता विद्यार्थी – विद्यार्थिनींनी शिक्षणाचे क्षेत्र ठरवणे शहाणपणाचे ठरणार आहे.
शिक्षण क्षेत्राचे विवेचन करताना आणखी एक नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे शिक्षण क्षेत्रावर कायम शासकीय धोरणे प्रभाव टाकत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणातील ज्या क्षेत्राला शासकीय धोरणे अनुकूल आहेत त्या क्षेत्रामध्ये करिअरला प्राधान्य दिले पाहिजे तरच शिक्षणातून सुरक्षितता आणि उज्ज्वल भविष्य या दोन्ही गोष्टी साकार होऊ शकतील.
महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या संस्था विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी अनेक उपक्रम आणि शैक्षणिक कोर्सेस घेऊन येत आहे. परंतु काही संस्थांनी शिक्षण पद्धतीत वेगळेपण दिले आहे. काही संस्था सध्या नोकरीच्या व उद्योजकीय संधी पाहून विविध नवीन अभ्यासक्रम राबवित आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना पदवीमध्येच असताना व्यावसायिक शिक्षणासोबत कौशल्याची जोड मिळणार आहे. त्यापैकीच दोन अभ्यासक्रम म्हणजे बॅचलर ऑफ मॅनेजमेंट सडीज इन एव्हिएशन सर्विसेस अँड एअर कार्गो आणि ऍग्रो स्टोरेज अँड सप्लाय चेन.
राज्यातील संजय घोडावत विद्यापीठामध्ये सध्या हे दोन्ही कोर्स सुरु करण्यात आले आहेत. स्वावलंबी शिक्षणाबरोबरच दर्जेदार आणि उज्वल भवितव्य घडवणारा हा महाराष्ट्रातील पहिला शैक्षणिक उपक्रम आहे . या उपक्रमाअंतर्गत पदवी शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना मासिक विद्यावेतन याचाही लाभ घेता येणार आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमातून स्वावलंबनाकडून उज्ज्वल भवितव्याकडे हा शिक्षणाचा एक दैदिप्यमान प्रवास साध्य करता येणार आहे. कोणत्याही विद्याशाखेचा बारावी शिक्षण पूर्ण झालेला विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र असेल.
आजच्या बदलत्या काळात स्पर्धा व्यवस्थेत टिकायचं असेल तर केवळ शिक्षण घेऊन उपयोग नाही तर त्या शिक्षणाच प्रशिक्षण घेण अधिक गरजेचं ठरतं. आणि वैशिष्ट्य म्हणजे हा अभ्यासक्रम शिक्षण – प्रशिक्षण या दोन पायांवर उभा आहे . वरती उल्लेख केल्याप्रमाणे केंद्र सरकारच्या योजना या कायमच शिक्षणाला समांतर आणि पूरक असतात . या अभ्यासक्रमाला केंद्रशासनाच्या उडान या योजनेमुळे अनेक शाश्वत संधी उपलब्ध झाले आहेत .
आपल्या देशामध्ये असणारी अनेक स्थानिक ठिकाणं एकमेकांशी कनेक्ट व्हावेत यासाठी केंद्र सरकारने उडान ही योजना सुरू केली आहे . हवाई प्रवास सर्वसामान्यांना माफक दरात उपलब्ध करून देणे हा या योजनेमागील मुख्य उद्देश . उडान ही बहुचर्चित योजना यशस्वी करण्यासाठी केंद्र सरकारला कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे . आणि असे कुशल मनुष्यबळ तयार करणाऱ्या संस्था खूप कमी आहेत . त्यामुळे संजय घोडावत विद्यापीठामध्ये सुरू होणारा हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी क्रांतिकारी निर्णय ठरला आहे. ”उडे देश का आम नागरिक” हे उडान योजनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जुडे देश का हर नौजवान और बडे देश का हर नौजवान अशी साद हा कोर्स विद्यार्थ्यांना घालत आहे.
या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना हवाई क्षेत्रातील करिअरची उत्तम संधी उपलब्ध होणार आहे. आणि सर्वात महत्वाचं या प्रशिक्षण काला दरम्यान रुपये सात हजार ते दहा हजार इतके विद्यावेतन विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामी मिळणार आहे.
त्यामुळे प्रचंड ध्येयवादी असणाऱ्या तरुणांना स्वावलंबनातून आपले उज्वल भवितव्य घडविण्यासाठी सुरक्षित भवितव्य घडविण्यासाठी हा अभ्यासक्रम नक्कीच दिशादर्शक ठरेल.
काळ कितीही वेगाने बदलत असणार तरीही कृषी आणि त्या संबंधित असलेल्या करिअर संधी या कायमच शाश्वत राहणार आहेत. जगाची वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण यामुळे कमी जमिनीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याची प्रक्रिया आणि त्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून हे क्षेत्र विकसित करण्यासाठी अनेक भांडवलदार आता पुढे येत आहेत. या सर्वाचा विचार करता कृषी क्षेत्र नक्कीच सुरक्षित करिअर क्षेत्र आहे. इतकेच नव्हे तर कोरोना सारख्या महामारीच्या काळात याच क्षेत्राचे महत्व वाढलेले आपणास पाहायला मिळाले.
नॅशनल एग्रीकल्चर मार्केट प्रोग्राम, नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल एग्रीकल्चर, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना , परंपरगत कृषी विकास योजना या आणि यांसारख्या अन्य महत्त्वाच्या शासकीय योजना कृषी क्षेत्रामध्ये शाश्वत विकास घडवण्यासाठी कार्यरत आहेत. येणाऱ्या काळात कोणत्याही सरकारला कृषिकेंद्रित धोरण ठरवून राज्यकारभार करावा लागेल त्यामुळे सरकारच्या तिजोरीत आतील बहुतांशी पैसा हा शेती आणि तत्संबंधी क्षेत्रांमध्ये गुंतवला जाईल. त्यामुळे कृषी क्षेत्र आणि ग्राहक यांच्यामधील दुवा बनण्यासाठी हा उपक्रम निश्चितच उपयोगी ठरणार आहे .
अलीकडे निर्माण झालेल्या नवमध्यम वर्गाला शेतामध्ये पिकलेला माल सुलभपणे मिळावा अशी इच्छा आहे . त्यामुळे मागणी तसा पुरवठा अर्थशास्त्रीय नियम लक्षात घेता , मध्यमवर्गाची अपेक्षा निश्चितच हा कोर्स पूर्ण करू शकतो . त्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये इंट्रेस्ट असलेल्या आणि त्यात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना हा एक अंतिम पर्याय ठरू शकतो.
—-
डॉ. योगेश्वरी एल. गिरी
डीन, फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट,
संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर.