
मुंबई, (विशेष प्रतिनिधी) : अभिनेता संजय दत्त आज अंधेरी येथील न्यायालयात हजर राहिल्याने त्याच्याविरोधात काढलेले अटक वॉरंट रद्द करण्यात आले. तो न्यायालयात हजर राहिल्यावर न्यायालयाने त्याचे अटक वॉरंट रद्द करण्याचा आदेश दिला.
२००२ साली दिग्दर्शक शकील नूरानी यांनी त्याच्याविरोधात खटला दाखल केला होता. या प्रकरणात न्यायालयात वेळोवेळी आदेश देवूनही संजूबाबा न्यायालयात उपस्थित होत नव्हता. त्यामुळे त्याच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात आले. मात्र आज सुनावणी दरम्यान तो उपस्थित राहिल्याने वॉरंट रद्द केले गेले. त्यामुळे संजूबाबाला दिलासा मिळाला.















