
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, रोशनचे दीप्तीवर प्रेम होते. कामानिमित्त तो मुंबईत असायचा मात्र दीप्तीचे सध्या दुसऱ्या कुणाशी तरी प्रेमप्रकरण सुरु असल्याचा संशय त्याच्या मनात होता. याचाच माग काढण्यासाठी तो गावात आला होता. आज सकाळी त्याने दीप्तीला गाठले आणि प्रकरणाचा जाब विचारत तिच्यावर धारधार कटरने वार केले. एव्हढ्यावरच न थांबता त्याने हातात असलेली बाटली तिच्या खांद्यावर मारली. या प्रकारात दीप्ती गंभीर जखमी झाली. यानंतर रोशन याने आपल्याच हातातील हत्याराने स्वतःच्या हातावर वार करत स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. प्रकार उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. दोघांनाही तात्काळ संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील गंभीर जखमी दीप्ती वर अधिकाऱ्यांनी तत्काळ उपचार करून तिला वाचवले तर रोशन ची तब्येतही आता स्थिर आहे. घटनेची माहिती मिळताच संगमेश्वरचे पोलिस निरीक्षक महेश थिटे, माखजन दुरक्षेत्राचे हे. कॉ. डि एस पवार व सहकार्यानी घटनास्थळी धाव घेतली.