रत्नागिरी : मुकबधीर तरुणीवर विवाहित तरुणाने बलात्कार केल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे येथे घडली. देवरुख पोलिसांनी नागेंद्र देसुरकर (रा. ताम्हाने फाटा) या आरोपिला या प्रकरणी अटक केली.
नागेंद्र याने त्याच्या पत्नीच्या सोबतीसाठी काही दिवसांपूर्वी पीडितेला बोलावले होते. त्याची पत्नी एके दिवशी दुपारी काही कामानिमित्त बाहेर गेली. याचवेळी घरी कोणीच नसल्याची संधी साधत त्याने तरुणीवर बलात्कार केला. कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. जानेवारीत हा प्रकार घडला होता.
तरूणीच्या पोटात दुखू लागल्याने औषधोपचारासाठी तिला रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हा ती दोन महिन्यांची गरोदर असल्याचे समजले. तिच्या आईने देवरुख पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. नागेंद्र विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.