मुंबई: विक्रोळी येथील विद्या विकास एज्युकेशन सोसायटी, संचालित डॉ. वा. शं. मटकर संगीत विद्यालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. सुधीर फडके यांच्या १७ व्या स्मृतिदिनिमित्त गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. बाबूजींच्या प्रथम स्मृतिदिनाचे औचित्य साधून २९ जुलै रोजी संस्थेच्या विश्वस्त व मुख्य कार्यकारी अधिकारी विद्या प. राऊत यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या स्पर्धेचे हे सलग १७वे वर्ष होते. बाबूजींच्या स्वर-सुमनांचा वारसा पूढील पिढ्यांपर्यंत नेण्याचे व्रत संस्थेने अविरतपणे सुरू ठेवले आहे.
स्पर्धेस सी. के. टी. विद्यालय (मराठी व इंग्रजी),पनवेल, आदर्श विद्यालय, कल्याण, पार्ले टिळक विद्यालय, विलेपार्ले, सेंट स्टनिस्लोस हायस्कूल, वांद्रे, उदयाचल हायस्कूल, सेंट जोसेफ हायस्कूल, पवार पब्लिक स्कूल, भांडुप, पोदार इंटरनॅशनल स्कूल, स्वामी शामानंद हायस्कूल, घाटकोपर, विद्या विकास माध्यमिक, वांगणी इ. शाळांचा तसेच विकास ज्युनिअर महाविद्यालय, रूपारेल महाविद्यालय, माटुंगा व किर्ति महाविद्यालय, दादर यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. स्पर्धेमध्ये १०८ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
स्मृतिगंध- समूह भक्तिगीतगायन स्पर्धा यंदाच्या स्पर्धेचे आकर्षण ठरले. संस्थेच्या विविध विभागातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी यांनी बाबूजींची भक्तिगीते सादर केली.परितोषिक विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे-
शालेय गट – गट १ ला (इ.१ली ते ४थी) , प्रथम क्र. : स्वर म्हात्रे, द्वितीय क्र. श्रावणी गावडे, तृतीय क्र. :अनन्या सावंत, उत्तेजनार्थ: अर्णव शेट्ये गट २रा (इ.५वी ते ७वी), प्रथम क्र.: आर्य परब,द्वितीय क्र.: वेदा मढवी, तृतीय क्र.: वेदिका म्हात्रे, उत्तेजनार्थ: प्रसाद फडके. गट ३रा (इ.८वी ते १०वी) प्रथम क्र.: मोनालिसा सामंता, द्वितीय क्र. वेदान्त चन्दन, तृतीय क्र.चिन्मय वेलनकर,उत्तेजनार्थ: ऋतुजा गडगे.
स्मृतीगंध: कै. विद्या प. राऊत यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ समूह भक्तिगीत स्पर्धा ( वय वर्ष १८ व पुढे ) डॉ. वा. शं. मटकर विद्यालयाने अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. तृतीय क्रमांक विकास हायस्कूल शिशू विभाग तर उत्तेजनार्थ विद्या विकास माध्यमिक शाळा, वांगणी यांनी मिळविला.
खुला गट –गट १ ला (वय वर्ष ५० पुढे ) प्रथम क्र. : प्रिया नाईक, द्वितीय क्र. सरिता गोगटे, तृतीय क्र. : भरत कस्तुर, उत्तेजनार्थ:उल्हास भानू गट २रा (वय वर्ष २६ ते ५० पर्यंत ), प्रथम क्र. :प्राप्ती वारदेकर, द्वितीय क्र. गावडे, तृतीय क्र. :सुवर्णा क्षेमकल्याणी, उत्तेजनार्थ: उदय कुलकर्णी, गट ३रा (वय वर्ष १७ ते २५) प्रथम क्र. : भावेश खाडे, द्वितीय क्र. वेदान्त सावंत , तृतीय क्र.:सौरव मेस्त्री , उत्तेजनार्थ: अनिकेत घायतडके
विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व धनादेश देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला विद्या विकास एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प. म. राऊत यांची विशेष उपस्थिती लाभली.