रत्नागिरी (आरकेजी): राज्यातील संगित राज्य नाट्य स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच त्याला वादाची सापडली आहे. संगित राज्य नाट्य स्पर्धेचं केंद्र रत्नागिरीतून कोल्हापूरला हलवल्यावरून हा वाद सुरु झाला आहे. या विरोधात संगीत नाट्यकर्मीनी उपोषणाला सुरुवात केली आहे.
रत्नागिरीतून कोल्हापूरला संगित राज्य नाट्य स्पर्धेचं केंद्र हलवल्यामुळे रत्नागिरीतील रंगकर्मी नाराज आहेत.रत्नागिरीतील नाट्यसरिक अविनाश काळे आजपासून या निर्णयाविरोधात उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद रत्नागिरी शाखा आणि रत्नागिरीतल्या विविध सांस्कृतिक संस्थांनी उपोषणाला पाठिंबा दिला आहे. १ ते २८ फेब्रुवारी दरम्यानं संगित राज्य नाट्य स्पर्धा होणार आहेत. गतवर्षी संगित नाट्य स्पर्धेतील विजयी संघाला राज्य संगित नाट्य स्पर्धेच्या केंद्राचा मान मिळतो. मात्र गेल्या वर्षी रत्नागिरीतील संगित नाटक प्रथम येवून सुद्धा हे केंद्र कोल्हापूरला हलवण्याचा घाट घातला गेला आहे. रत्नागिरीला राज्य संगित नाटकाचे केंद्र मिळावे यासाठी अविनाश काळे यांच्यासह अनेक नाट्यकर्मी आणि रसिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर उपोषण सुरुवात केली आहे. दरम्यानं नाट्यपरिषदेचे शाखाध्यक्ष आणि आमदार उदय सामंत यांनी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्यासोबत या संदर्भातील पत्रव्यवहार केला आहे.मात्र रत्नागिरीचा मान पश्चिम महाराष्ट्राला देण्यात आल्यानं रत्नागिरीतले नाट्यकर्मी चांगलेच संतापलेले पहायला मिळत आहेत.