रत्नागिरी : त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त खास रत्नागिरीकरांसाठी समर्थ इन्व्हेस्टमेंट आयोजित व आर्च एंटरप्रायझेस प्रस्तुत ‘जब दीप जले आना’ या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता रॉयल बँक्वेट, जे. के. फाईल येथे होणार आहे.
या कार्यक्रमानिमित्त समर्थ एंटरप्रायझेसतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिजित सरदेसाई, सौ. प्रिया थेटे, अनिरूद्ध थेटे, गौरी जोशी, निलेश जोशी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची माहिती देताना अभिजित सरदेसाई यांनी सांगितले की, दरवेळी आम्ही रत्नागिरीकरांना नवनवीन कार्यक्रम देत असतो. यावेळी त्रिपुरी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर जब दीप जले आना या लोकप्रियतेचा कळस गाठलेल्या मराठी व हिंदी गीतांचा स्वरोत्सव खास रत्नागिरीकरांसाठी आयोजित केला आहे.
हा कार्यक्रम विनामूल्य होणार असून त्यासाठी निमंत्रितांकरिता विशेष पासची व्यवस्था करण्यात आली आहे. २१ नोव्हेंबरपासून सकाळी १०.३० ते १.०० आणि सायंकाळी ५ ते ७ या वेळेत समर्थ इन्व्हेस्टमेंट, सुभाष प्लाझा, शॉप नं. ५, साळवी स्टॉप येथून प्रवेशिका घेऊन जाव्यात असे आवाहन त्यांनी यावेळी केले.