मुंबई, (निसार अली) : मढ येथील एरंगळ गावातील ग्रामस्थांनी नवनिर्वाचित नगरसेविका संगीता सुतार यांचा नागरी सत्कार केला. सुतार या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. गावात भेडसावणार्या नागरी समस्या संपूर्णपणे सोडवू, त्यासाठी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करू, उत्तम दर्जाच्या सोईसुविधा निर्माण करू, असे सुतार यांनी यावेळी सांगितले. उपविभागप्रमुख अनिल भोपी, संजय सुतार, किरण कोळी, नरेश ठाकूर, बाबू सुतार आणि शेकडो ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.