पालघर : जागतिक पाणथळ जागा दिनानिमित्त सिंधू सह्याद्री फाउंडेशन तर्फे शिरगाव समुद्र किनारी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्या मधे सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, आर्यन हायस्कूल आणि निजप हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
पाणथळ जागांच्या बद्दल जनजागृती व्हावी ह्या निमित्त सहभागी विद्यार्थ्यांनी विविध वालुशिल्प साकारली होती. त्याच सोबत सहभागी विद्यार्थ्यांना सागर किनारी आढळणाऱ्या प्राण्यांची सागर भ्रमंती द्वारे भेट करून देण्यात आली ज्या मधे विद्यार्थ्यांनी तारा मासा, खेकडे, समुद्र फुल इत्यादी सागरी जीव पाहिले.
कार्यक्रमास सिंधू सह्याद्री फाउंडेशन चे संचालक श्री. भूषण भोईर, कौस्तुभ कदम, सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्रा. मोगले सर, आर्यन हायस्कूल चे श्री. ज्ञानेश्वर माळी सर आणि यमुना यशवंत शाळेच्या सौ. वैभवी वडे मॅडम आणि 60 विद्यार्थी उपस्थित होते.
अशी माहिती भूषण भोईर, संचालक, सिंधू सह्याद्री फाउंडेशन यांनी दिली.