रत्नागिरी : राज्य सरकारने सनातनवर बंदी आणण्याचा प्रस्ताव यापूर्वीच केंद्राकडे पाठवला आहे. याबाबत विरोधकांचे आरोप चुकीचे असल्याचं विधान गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी रत्नागिरी येथे केलं आहे. केंद्र सरकार याबाबत वस्तुस्थितीचा विचार योग्य तो निर्णय घेईल असंही केसरकर यांनी म्हटलं आहे जिल्हाधिकारी काजू उत्पादकांसोबत झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते.
डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची आरोपीने कबुली दिल्यानंतर सनातन संस्थेवरील बंदीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र सनातनवर बंदी घालण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने यापूर्वीच केंद्र सरकारकडे पाठवला आहे. त्यानंतर यामध्ये ज्या काही त्रुटी होत्या, त्यांची पूर्तता करून पुन्हा हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला आहे. हा प्रस्ताव सध्या केंद्र सरकारकडे आहे, त्यामुळे विरोधकांचे आरोप चुकीचे असल्याचे केसरकर यांनी म्हटलं आहे.