कोलकाता : सॅमसंग इंडियाने इलेक्ट्रॉनिक उत्पादनांमध्ये विस्तार केला आहे. सौर ऊर्जेवर चालणारे रेफ्रिजरटर आणि 8 पोल डिजिटल इन्व्हर्टर एअर कंडिशनर कंपनीने बाजारात दाखल केले आहेत. यातील डिजिटल इन्व्हर्टर तंत्रज्ञानाने ४३ टक्के अधिक जलद गतीने कुलिंग होणार आहे. जलद गतीने कुलिंग, ऊर्जा बचत, टिकाऊपणा आणि उत्तम रचना अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर त्यात केला गेला आहे.
“ग्राहकांना सक्षम आणि अत्याधुनिक उत्पादने हवी असतात आणि कंपनीच्या रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनरच्या नव्या श्रेणीत ग्राहकांची हीच गरज आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे,” असे सॅमसंग इंडियाच्या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्सचे उपाध्यक्ष राजीव भुतानी म्हणाले.