
मुंबई, १९ ऑगस्ट २०२६: सॅमसंग इंडियाने गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा आणि गॅलेक्सी झेड फोल्ड८ स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी स्थिर मालकी उपक्रम गॅलक्सी फॉरएव्हर लाँच केला आहे. हा उपक्रम २४ महिन्यांचा नो-कॉस्ट ईएमआय, सॅमसंग केअर+ डिवाईस प्रोटेक्शन आणि डिवाईसच्या इनव्हॉइस मूल्याच्या ५५ टक्क्यांपर्यंत अॅश्युअर्ड बायबॅक मूल्य देतो.
गॅलक्सी फॉरएव्हर तरुण ग्राहकांसाठी डिझाइन करण्यात आला आहे, जे आज प्रीमियम फोल्डेबल फोन असण्याची इच्छा ठेवतात, पण ते अपग्रेड करण्यासाठी तयार असतात तेव्हा त्याच्या मूल्याबद्दल अधिक खात्री इच्छितात. प्रचलित रीसेल किमतींवर पूर्णपणे अवलंबून राहण्याऐवजी, ग्राहकांकडे या उपक्रमाच्या अटींच्या अधीन राहून आपले डिवाईस अपग्रेड करण्याचा किंवा परत करण्याचा निश्चित मार्ग उपलब्ध आहे.
गॅलेक्सी फॉरएव्हर उपक्रमात ग्राहकांसाठी तीन मुख्य फायदे एकत्र आणण्यात आले आहेत. यामध्ये ग्राहकांना २४ महिन्यांचे नो-कॉस्ट ईएमआय दिले जाते, ज्यामुळे प्रीमियम फोल्डेबल तंत्रज्ञान अधिक सहजसाध्य आणि परवडणारे बनते. यासोबतच, ग्राहकांना अधिक मनःशांती देण्यासाठी झिरो क्लेम प्रोसेसिंग फी सह ‘सॅमसंग केअर+ डिवाईस प्रोटेक्शन’ प्रदान केले जाते, जे फोन नकळतपणे खाली पडल्यामुळे किंवा द्रवपदार्थामुळे होणाऱ्या नुकसानापासून (लिक्विड डॅमेज) पूर्ण संरक्षण देते; विशेष म्हणजे हे केअर+ या उपक्रमात आधीपासूनच समाविष्ट असल्याने ग्राहकांना ते वेगळे खरेदी करण्याची आवश्यकता नाही. याव्यतिरिक्त, यात ५५ टक्क्यांपर्यंत अॅश्युअर्ड बायबॅक मूल्य दिले जाते, ज्यामुळे ग्राहक या उपक्रमाच्या अटींच्या अधीन राहून १०व्या महिन्यापासूनच आपले डिवाईस अपग्रेड करू शकतात किंवा परत करू शकतात.
गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा गॅलक्सी फॉरएव्हरच्या माध्यमातून प्रति महिना ९४१७ रुपये ईएमआयसह उपलब्ध आहे, तर गॅलेक्सी झेड फोल्ड८ च्या ईएमआयची सुरूवात प्रति महिना ८५८४ रुपये या दराने होते. दोन्ही प्लॅन्स २४ महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआयवर आधारित आहेत आणि त्यामध्ये गॅलक्सी फॉरएव्हर उपक्रम शुल्काचा समावेश आहे.
अॅश्युअर्ड बायबॅक मूल्य हे ग्राहक कोणत्या कालावधीत त्यांचे डिवाईस अपग्रेड किंवा परत करणे निवडतात, यावर अवलंबून असते. यामध्ये जर ग्राहकाने १०व्या ते ११व्या महिन्यात डिवाईस अपग्रेड किंवा परत केले, तर त्यांना डिवाईसच्या इनव्हॉइस मूल्याच्या ५५ टक्के बायबॅक मूल्य मिळते. त्यानंतर १२व्या ते १३व्या महिन्यात ५० टक्के, १४व्या ते १८व्या महिन्यात ४५ टक्के आणि १९व्या ते २५व्या महिन्यात ४० टक्के बायबॅक मूल्य दिले जाते.
हे ग्राहकांना त्यांच्या पुढील अपग्रेडचे नियोजन करताना अधिक स्पष्टता प्रदान करते. गॅलक्सी फॉरएव्हर ग्राहकांना त्यांचे डिवाईस कसे वापरावे याविषयी स्थिरता देखील देते. ज्या ग्राहकांना अपग्रेड करायचे आहे ते या उपक्रमाद्वारे पुढील गॅलेक्सी प्रमुख डिवाईसेस खरेदी करू शकतात. ज्यांना त्यांचे सध्याचे डिवाईस वापरणे सुरू ठेवायचे आहे ते उपक्रमाच्या लागू अटींच्या अधीन राहून त्यांचे डिवाईस वापरणे सुरू ठेवू शकतात.
हा उपक्रम पारंपारिक स्मार्टफोन मालकीची जागा घेण्याऐवजी त्याला पूरक ठरेल अशा पद्धतीने डिझाइन केला गेला आहे. ग्राहक त्यांचे स्मार्टफोन पूर्णपणे खरेदी करणे आणि त्यांची मालकी ठेवणे सुरू ठेवू शकतात. गॅलक्सी फॉरएव्हर अशा ग्राहकांसाठी एक पर्याय प्रदान करतो, जे अंदाज लावण्यायोग्य अपग्रेड पर्याय, डिवाईस प्रोटेक्शन आणि दीर्घकालीन मालकीच्या खर्चाला अधिक महत्त्व देतात. गॅलक्सी फॉरएव्हरसह सॅमसंग फायनान्सिंग, प्रोटेक्शन आणि अॅश्युअर्ड बायबॅक मूल्य एकाच मालकीच्या प्रस्तावात एकत्र आणते. हे ग्राहकांना आजच नवीन गॅलेक्सी फोल्डेबल तंत्रज्ञान उपलब्ध करून देते, तसेच ते अपग्रेड करण्याचा निर्णय घेतात तेव्हा अधिक स्पष्ट मार्ग प्रदान करते.
गॅलेक्सी फॉरएव्हर उपक्रमांतर्गत ग्राहकांसाठी अनेक आकर्षक वैशिष्ट्ये आणि फायदे एकत्र आणण्यात आले आहेत. या योजनेद्वारे गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा हे मॉडेल प्रति महिना ९,४१७ रुपयांच्या सुलभ हप्त्यावर उपलब्ध आहे, ज्यामध्ये ८,३३४ रुपये डिवाईस ईएमआय आणि १,०८३ रुपये उपक्रम शुल्काचा समावेश आहे. तसेच, गॅलेक्सी झेड फोल्ड८ हे मॉडेल प्रति महिना ८,५८४ रुपयांवर मिळवता येईल, ज्यामध्ये ७,५०० रुपये डिवाईस ईएमआय आणि १,०८४ रुपये उपक्रम शुल्क समाविष्ट आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना २४ महिन्यांचे नो-कॉस्ट ईएमआय दिले जाते. याशिवाय, योजनेच्या अटींच्या अधीन राहून १० व्या महिन्यापासूनच ५५ टक्क्यांपर्यंत अॅश्युअर्ड बायबॅक मूल्याचा लाभ घेऊन डिवाईस अपग्रेड किंवा परत करण्याची सुविधा मिळते. ग्राहकांच्या पूर्ण सुरक्षेसाठी या उपक्रमात झिरो क्लेम प्रोसेसिंग फी सह ‘सॅमसंग केअर+ डिवाईस प्रोटेक्शन’ देखील समाविष्ट करण्यात आले आहे.














