
~ सॅमसंग गॅलेक्सी झेड सिरीज खरेदी करणे झाले सोपे ~
मुंबई, ५ ऑगस्ट २०२६: सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा, गॅलेक्सी झेड फोल्ड८ आणि गॅलेक्सी झेड फ्लिप८ साठी ३०-महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआय पर्यायांच्या लाँचसह प्रीमियम स्मार्टफोन मालकीला नव्या उंचीवर घेऊन जात आहे, ज्यामुळे सॅमसंगच्या आधुनिक फोल्डेबल नाविन्यता सुलभपणे उपलब्ध होत आहेत. मासिक मालकीचा अडथळा कमी करण्यासाठी डिझाइन केलेले नवीन फायनान्सिंग पर्याय अधिकाधिक ग्राहकांना शून्य डाऊन पेमेंटसह गॅलेक्सी एआयद्वारे समर्थित सॅमसंगच्या नवीन गॅलेक्सी झेड सिरीजचा अनुभव घेण्याची सुविधा देतो.
फोल्डेबल नाविन्यतेचे सात जनरेशन्स आणि ग्राहकांच्या अभिप्रायावर डिझाइन केलेली सॅमसंगची नवीन गॅलेक्सी झेड सिरीज हिंग डिझाइन, डिस्प्ले, टिकाऊपणा आणि कार्यक्षमतेमध्ये उत्कृष्ट अभियांत्रिकीसह विशेष हेतूने बनवलेले गॅलेक्सी एआय एकत्रित करून आतापर्यंतचा सर्वात परिष्कृत फोल्डेबल अनुभव देते. हे नवीन फायनान्सिंग प्रपोजल सॅमसंगचे नवीन फोल्डेबल अनुभव खरेदी करणे सोपे करून या नाविन्यतेचा डिवाईसच्या पलीकडे विस्तार करते.
ग्राहक आता गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा प्रति महिना फक्त ६६६७ रुपये यापासून सुरू होणार्या ईएमआयसह खरेदी करू शकतात. हा ईएमआय आधीच्या जनरेशनमधील गॅलेक्सी झेड फोल्ड७ पेक्षा ९ टक्के कमी आहे. गॅलेक्सी झेड फोल्ड८ प्रति महिना ६००० रुपयांपासून सुरू होणार्या ईएमआयसह उपलब्ध आहे, तर गॅलेक्सी झेड फ्लिप८ प्रति महिना फक्त ४१६७ रुपयांपासून सुरू होणार्या ईएमआयसह उपलब्ध आहे, ज्यामुळे अत्याधुनिक फोल्डेबल तंत्रज्ञान अधिकाधिक ग्राहकांना परवडणारे होत आहे.
३०-महिन्यांचे नो-कॉस्ट ईएमआय प्रपोजल सॅमसंग फायनान्स+ (डीएमआय फायनान्सद्वारे समर्थित), टीव्हीएस क्रेडिट, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि पूनावाला फिनकॉर्पद्वारे उपलब्ध आहे, जे ग्राहकांना सॅमसंगच्या नवीन फोल्डेबल नाविन्यतांची मालकी मिळवण्यासाठी अधिक स्थिरता प्रदान करते.
३०-महिन्यांचा परतफेडीचा कालावधी ग्राहकांना मालकीचा खर्च दीर्घ कालावधीत विस्तारित करण्यास सक्षम करतो, ज्यामुळे गॅलेक्सी एआय नाविन्यता, प्रीमियम डिझाइन आणि प्रमुख कार्यक्षमतेचा आनंद घेत प्रीमियम फोल्डेबल तंत्रज्ञानाची मालकी मिळवणे सोपे होते.
गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा व्हायलेट शॅडो, ग्रॅफाइट, क्रीम आणि ग्रीन शॅडो (ऑनलाइन एक्सक्लुझिव्ह) रंगांमध्ये १,९९,९९९ रुपयांपासून उपलब्ध आहे. गॅलेक्सी झेड फोल्ड८ लॅव्हेंडर, ग्रॅफाइट, क्रीम आणि पिस्ता (ऑनलाइन एक्सक्लुझिव्ह) रंगांमध्ये १,७९,९९९ रुपयांपासून उपलब्ध आहे. गॅलेक्सी झेड फ्लिप८ पिंक, ग्रॅफाइट, क्रीम आणि मिंट (ऑनलाइन एक्सक्लुझिव्ह) रंगांमध्ये १,२४,९९९ रुपयांपासून उपलब्ध आहे. सर्व डिवाईसेस प्रमुख ऑनलाइन आणि ऑफलाइन रिटेल स्टोअर्समध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहेत. नवीन फायनान्सिंग प्रपोजल सॅमसंगडॉटकॉम, सॅमसंग एक्सपिरियन्स स्टोअर्स आणि संपूर्ण भारतातील सहभागी रिटेल आउटलेट्सवर उपलब्ध आहे.














