नवी दिल्ली : सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने गेमिंगची आवड असणार्यांसाठी कर्व्ह गेमिंग मॉनिटर भारतात दाखल केला. या वक्राकार मॉनिटरची त्रिज्या १८०० मिमी इतकी आहे. अत्याधुनिक सुविधनांनी प्राप्त असा हा मॉनिटर लवकरच भारतीयांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.
सॅमसंग इंडिया इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक पुनित सेठी म्हणाले की, “डिस्प्ले गेमिंगची आवड असणार्यांना मॉनिटरचा डिस्प्ले तंत्रज्ञानात सर्वोत्तम असा हवा असतो. त्यासाठी अत्याधुनिक मॉनिटरची गरज होती आणि सॅमसंगने ती पूर्ण केली आहे. आमचे उत्पादन गेमिंगमध्ये एक नवा ट्रेण्ड प्रस्थापित करेल.”
वैशिष्ट्ये
*१४४ एचझेड रिफ्रेश रेट
* १ एमएस प्रतिसादाची वेळ
* क्वांटम डॉट तंत्रज्ञान
* सर्वोच्च दर्जाची स्क्रीन