मुंबईः(शांत्ताराम गुडेकर ) : कोविड-१९ या महामारी काळात प्रत्येकजण आपआपल्या परीने जी काही मदत करता येईल ती करत होता. बोरीवली येथील सामाजिक कार्यकर्ता, महाराष्ट्र हरित सेना वन विभाग- महाराष्ट्र शासन सदस्य, माझी वसुधरा मित्र( पर्यावरण व वातावरनिय बदल विभाग- महाराष्ट्र शासन),माहिती अधिकार/पोलीस मित्र /पत्रकार संरक्षण सेना चे मुंबई जन संपर्क अधिकारी समीर विजय खाडिलकरही याला अपवाद नाहीत.समीर विजय खाडिलकर यांना सेवार्थ उपक्रमांची चळवळ असे ब्रीद वाक्य घेऊन मुंबईसह कोकण आणि अनेक जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण, कला, क्रीडा, सांस्कृतीक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कोकण कट्टा या संस्थेतर्फे समीर विजय खाडिलकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना ” कोकण कट्टा सन्मान-२०२१” या पुरस्काराणे वीर सावरकर सेवा केंद्र, सनसिटी चित्रपट गृह समोर, विलेपार्ले पूर्व, मुंबई -५७ येथे डॉ. गजानन रत्नपारखी (हृदयरोग तज्ञ, अध्यक्ष : गुरुकृपा फाउंडेशन) यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ऍड. मनमोहन चोणकर
संतोष ठाकूर( पनवेल),संस्थापक अजित पितळे, अध्यक्ष नितीन कुलकर्णी, सचिव योगेश साटम, कोषाध्यक्ष सुजित कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत होते.कोकण कट्टा च्या २२ व्या वर्धापन दिन निमित्ताने शनिवार दिनांक ११ डिसेंबर २०२१ रोजी १) सौ. स्नेहा सचिन पाटील- मोरे (पत्रकार- लोकमत),२) शैलेश जाधव ( म. टा. छायाचित्रकार),३) प्रमोद तरळ (मुक्त पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते),४) हेमंत सावंत ( समाजसेवक आणि अध्यक्ष,स्वामी सेवा फाउंडेशन),५) समीर खाडिलकर (सामाजिक कार्यकर्ते),६) विजय बेटकर (अचानक मित्र मंडळ),७) विकास सांबरे (सामाजिक कार्य- हनुमान कला,क्रीडा मंडळ),८) गणेश देवरुखकर (प्रशिक्षक- मल्लखांब),९) कृष्णा येद्रे ( यु ट्यूब- आम्ही कोकणकर),१०) निखिल सकपाळ ( यु ट्यूब – कोकणी निखिल),११) अनिकेत रासम ( यु ट्यूब – गोष्ट कोकणातली वाहिनी),१२) प्रगत लोके ( यु ट्यूब – प्रगत लोके चॅनेल),१३) संजय जाधव ( रुग्णसेवा ),१४) विवेक वैद्य,१५)आत्माराम डिके यांना गौरविण्यात आले.खाडिलकर यांना हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांना अनेकांकडून अभिनंदनासह शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.