
मुंबई, (निसार अली) : विविध मागण्यांसाठी समाजवादी पार्टीच्याने पालिका पी-उत्तर विभागाच्या कार्यालयासमोर आज धरणे प्रदर्शन करण्यात आले. अनधिकृत बांधकामावर नियंत्रण, मालवणीतील पाणी माफियावर कठोर कारवाई तसेच मालवणी परिसरात नियमित साफसफाईसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी समाजवादी पार्टीच्या मुबई अध्यक्ष नगरसेविका रुखसाना सिद्दीकी आणि स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
















