
रत्नागिरी : दिव्यांग बांधव हा शारिरीक व्याधीवर मात करुन समाजात जगत असतो त्यामुळे आपण सर्वजण समाज म्हणून त्यांच्या पाठीशी उभे रहाणे गरजेच आहे असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालय आवार, अल्पबचत सभागृह येथे 3 डिसेंबर अपंग दिन – सुलभ निवडणूका कार्यक्रम प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, रत्नागिरी प्रांतधिकारी अमित शेडगे, रत्नागिरीचे तहसिलदार मच्छिंद्र सुकटे, आस्था फाऊंडेंशन संस्थेच्या सुरेखा जोशी, संकेत चाळके, प्रसाद आंबोळकर, राज्य अंपग कर्मचारी संघटनेचे गोरे, त्रिपाठी आदि मान्यवर तसेच वेगवेगळया संघटनेचे प्रतिनिधी, दिव्यांग तसेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले 01 सप्टेंबर 2018 ते 31 ऑक्टोबर 2018 मध्ये करण्यात आलेल्या मतदार पुर्नरक्षिण कार्यक्रमातंर्गत जिल्हयामध्ये 92604 नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आलेली असून जिल्हयाचे 258 टक्के काम झाल आहे. मतदानामध्ये दिव्यांग व्यक्तींना मतदार केंद्रापर्यंत पोहचविण्यासाठी, सुलभ मतदान व्हावे यासाठी आवश्यक ती सर्व दक्षात घेण्यात येत आहे. त्यामुळे सुलभ निवडणुका या ब्रीदवाक्यानुसार सुलभ मतदान करता येणार आहे. तसेच यावेळी होणाऱ्या मतदान प्रक्रीमध्ये ईव्हीएम मशीन बरोबर व्हीव्हीपॅट असणार आहे त्यामुळे आपण कुणाला मतदान केले ते स्क्रीनवर दिसणार आहे. तसेच त्याची प्रिंटही निघणार आहे. त्यामुळे मतदान प्रक्रीयेमध्ये पारदर्शकता वाढणार आहे. मतदान करणे हा प्रत्येकाचा हक्क आहे, कर्तव्य आहे आपलाही आहे आणि आपण तो बजवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केला. आपल्या दिव्यांग बांधवामध्ये काही कलाकार, चित्रकार आहेत काही आपल्या पायांनी लिहीतात, संगणक चालवतात . या दिव्यांगामध्ये एक असामान्य अशी शक्ती आहे. सर्व अडचणींवर मात करुन ते जीवन जगत असतात. आपल्याला सर्व त सहकार्य करण्यासाठी आपण सराकारचा प्रतिनिधी म्हणून कटिबध्द असल्याचे ते म्हणाले. आपल्या जिवनामध्ये उजाळा निर्माण करण्यासाठी, आपले जीवन सुलभ करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करु असा विश्वासही त्यांनी यावेळी दिव्यांग बांधवाना दिला.
जिल्हाधिकारी पुढे म्हणले मतदार पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 3 हजार 764 नवीन दिव्यांग मतदार बांधवाचे अर्ज नोंदवीलेले आहेत. मतदार वाढविण्यामध्ये ज्या संस्थेने मदत केली त्यांचे आभारही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी मानले. लोकशाही प्रक्रीयेमध्ये मतदार हा सर्वात महत्वाचा घटक आहे. मतदानाच्या माध्यमातून आपल्याला आपले विचार व्यक्त करण्याचा हक्क देण्यात आलेला आहे. त्यामुळे मतदान करणे हा आपल्याला दिलेला हक्क आहे आपले कर्तव्य आहे. आपल स्वत:च, आपल्या बांधवाचे, आपल्या गावाच, आपल्या राज्याच आपल्या देशाच विकास साधण्यासाठी मतदानाचा हक्क बजावणे गरजेच आहे. तरी सर्वजण मतदानाचा हक्क बजवाल आणि मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आस्था फाऊडेशनच्या सुरेखा जोशी यांनी दिव्यांगाना मतदानाच्या महत्वाच्या प्रक्रीमध्ये समावून घेण्यासाठी शासनाकडून घेण्यात आलेल्या प्रयत्नाबद्दल आभार मानले. दिव्यांगाना मतदान करताना कोणत्याही अडचणी होऊ नये साठी शासनाकडून सर्व सुविधा पुरविण्यात येणार आहेत, त्यामुळे सर्वांनी मतदानाचा हक्क बजवा असे आवाहन त्यांनी दिव्यांगाना केले.
यावेळी उपजिल्हानिवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, प्रांतधिकारी मच्छिंद्र सुकटे, प्रसाद आंबोलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ज्या संस्थेने मतदार वाढीसाठी प्रयत्न अशा आस्था फाऊडेशन, माहेर संस्था, केशव परशुराम अभ्यंकर मुकबधिर विद्यालय, तसेच अपंगात्वर मात करुन स्वत:च्या पायानी लिहणाऱ्या, संगणक चालवाणाऱ्या , मराठी पाऊल पडती पुढे यासारख्यया कार्यक्रमामध्ये भाग घेतलेल्या धीरज साटवीलकर, तसेच म्हात्रे आदिंचा प्रशस्तीपत्रक व पुष्पगुच्छ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे तहसिलदार मच्छींद्र सुकटे यांनी प्रास्ताविक केले.















