रत्नागिरी, (आरकेजी) : सीबीएसई बोर्डाच्या जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात कोकणातील सलोनी जोशी ही तब्बल ९९.८० टक्के गुण मिळवत देशात अव्वल आली आहे.
खेड येथील रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलची सलोनी ही विद्यार्थीनी आहे. ५०० पैकी ४९९ गुण तीला मिळाले आहेत. याच शाळेतील दिव्या जाडकर हिने ९९.४० टक्के गुण प्राप्त केले आहेत. सार्थक बावधनकर याला ९७.२० टक्के गुणा मिळाले आहेत. डॉ. शर्वरी अनिल जोशी यांची कन्या असलेल्या सलोनीने गणित, विज्ञान, समाजशास्त्र, मराठी विषयात १०० पैकी १०० गुण मिळवत नवीन विक्रम रचला आहे.
इंग्रजी विषयात तिला १०० पैकी ९९ गुण मिळाले आहेत. याआधी महाराष्ट्र ऑलिंम्पियाड परीक्षेत तिने राज्यात ७ वा तर सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात सातवा क्रमांक प्राप्त केला होता. होमी भाभा परीक्षेसह तालुका व जिल्हास्तरीय वत्कृत्व स्पर्धेतही तिने यश मिळवले आहे.