मुंबई, (निसार अली) : साक्षर वेल्फेअर सोसायटी मालाड मध्ये राबवत असलेल्या सामाजिक कामाचे विविध स्तरातून कौतुक केले जात आहे. मालाड मालवणी मधील जे घटक वंचित आहेत, त्यांना तातडीने मदत पुरविण्याचे महत्वाचे कार्य साक्षर कडून केले जात आहे. उद्या या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सौरभ जोशी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कार्पोरेट क्षेत्रात दबदबा असलेले सौरभ जोशी यांनी सामाजिक क्षेत्रात काही तरी करता यावे, यासाठी साक्षर ची स्थापना केली आहे. गरीब विद्यार्थ्यांना व्यावसायिकरित्या सक्षम करणे, समाजातील वंचित घटकांना हिवाळा, पावसाळा या ऋतूत दैनंदिन वस्तू पुरविणे आणि पर्यावरणाचे संरक्षण आदी कार्य करत आहेत.
उच्च शिक्षित असलेले सौरभ हे युवा परिवर्तन या संस्थेबरोबर कौशल्यावर आधारित कार्यक्रम युवकांसाठी राबवत आहेत. समाजात बदल घडवणे आणि नागरिकांचे जीवनमान उंचावणे हा हेतू असल्याचे सौरभ यांनी सांगितले.