
राजापूर तालुक्यातील साखरीनाटे येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला आणण्यास गेलेल्या कोरोना योद्ध्यांवर बुधवारी जमावानं हल्ला केला होता. यामध्ये एक आरोग्य कर्मचारी आणि एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता. दरम्यान, या प्रकरणात आता 250 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यावेळी जमावाला हिंसक होण्यास प्रवृत्त करणाऱ्या सात जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या या गावातील परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये. पोलिसांना सहकार्य करावं. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून नये असं आवाहन यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड यांनी केलं आहे.