
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून साखर कारखान्यांना दिलेलं कर्ज हे नियमानुसारच दिलेले आहे. त्याची वसुलीही 100 टक्के आहे, असा खुलासा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला.
साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जावरून एकीकडे राज्यातील काही जिल्हा बँका अडचणीत आलेल्या आहेत. अशातच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने साखर कारखान्यांना दिलेल्या दिलेल्या 338 कोटी रुपयांच्या कर्जामुळे जिल्हा बँक चर्चेत आली आहे. मात्र, साखर कारखान्यांना देण्यात आलेलं हे कर्ज सन 2013 ते 2018 या कालावधीत देण्यात आलेलं असून ते नियमानुसारच देण्यात आलेले आहे. राखीव निधीतून हे कर्ज देण्यात आलेले नाही. हे कर्ज देताना कारखान्यांची मालमत्ता, त्या कारखान्याच्या चेअरमनची खासगी मालमत्ता मॉर्गेज म्हणून घेण्यात आली असल्याचं स्पष्टीकरण बँकेचे अध्यक्ष डॉ तानाजीराव चोरगे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये. साखर कारखान्यांना दिलेल्या 338 कोटींच्या कर्जापैकी 80 कोटी वसूल झाले असून 269 कोटी कर्ज येणे बाकी आहे. या कर्जामधून बँकेला जवळपास 31 कोटी रुपये वर्षाला व्याज मिळतं. त्यामुळे बँकेच्या उत्पन्नात भरीव वाढ झाली आहे. पण साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जामुळे कोणताही खातेदार धास्तावलेला नसल्याचं डॉ. चोरगे म्हणाले.
















