मुंबई, (निसार अली) : आपल्या विविध मागण्यांसाठी वर्षा बंगल्यावर गेलेल्या सकल ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यां
देशात ओबीसी समाजाची लोकसंख्या जास्त आहे. तरिही ओबीसींच्या मुलांना शैक्षणिक सोई सुविधा तसेच ओबीसींना त्यांचे हक्क मिळत नाहीत. या समाजाला शिक्षणात सुविधा तसेच हक्क मिळाले पाहिजे, अशी मागणी सकल ओबीसी समाजाने केली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन तास पावसात उभ्या असलेल्या या महिलांची दखल घेतली नाही, असा आरोप समाजाच्या वतीने करण्यात आला आहे. यापूर्वीही अनेकदा मंत्रालयात निवेदन देऊन देखील फडणवीस यांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्यांची थेट भेट घेण्याची वेळ ओबीसी महिलांच्या शिष्ट मंडळावर आली, असे कांचन जांबोटी यांनी सांगितले.
जांबोटी म्हणाल्या, सरकार बदलले पण धोरणे मात्र तीच आहेत. या सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करतो तसेच ओबीसींची दखल सरकार ने घेतली नाही तर आम्ही मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन करू असेही त्या यावेळी म्हणाल्या.