मुंबई, (निसार अली) : ओबीसिंचे विविध प्रश्न सरकार दरबारी सुटावेत यासाठी सकल ओबीसी समाज करत असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला विविध ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज सोमवारी कोल्हापुरात झालेल्या आंदोलनाला प्रचंड प्रमाणात पाठिंबा मिळाला.
आरक्षणाचे जनक राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या भूमीत सकल ओबीसी समाजाने आपल्या हक्कांसाठी लाााक्षणि उपोषण व आंदोलन केले.
महाराणी ताराबाई यांच्या प्रेरणेने आज मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि नागरिक कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सहभागी झाले होते.
पुढील पिढीच्या हक्क व हिता साठी 92 वर्षाच्या भीमाबाई पवार या आंदोलनात सामिल झाल्या. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन देऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली.