मुंबई : बांगलादेशमध्ये धर्माच्या आधारे हिंदूंवर सतत होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू समाजाने रविवारी आंदोलन केले. जैन मंदिर, सर्वोदय नगर ते मेहूल चौक पर्यंत अनेक कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले.
नाहूर गाव, सर्वोदय वसाहत, विवेकानंद वसाहत येथील हिंदू बंधू-भगिनींनी यावेळी महाआरती देखील केली आणि बांगलादेशी हिंदू बांधवांना आपला पाठिंबा व्यक्त केला.
बांगलादेशी हिंदू बांधवांवरील अत्याचार त्वरित थांबायला हवेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. हिंदुविरुद्ध होणाऱ्या अत्याचाराविरोधात जग गप्प का? असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला.