मुंबई : सैन्य दलआणि माजी सैनिकांसाठी महिंद्रा मोजो आणि महिंद्रा गस्टो १२५ कँटीन सर्व्हिस डिपार्टमेंट (सीएसडी) येथ उपलब्ध करत असल्याचे महिंद्र टु व्हीलर्सने आज जाहीर केले. यामुळे महिंद्राच्या दुचाकी अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचतील आणि या ब्रँडचे भारतातील स्थान अधिक बळकट होईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.
‘ग्राहकांना आमच्या ब्रँडचा सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील असतो. सीएसडी अंतर्गत गस्टो १२५ आणि मोजो श्रेणी उपलब्ध केल्यामुळे सैन्यदल आणि माजी सैनिकांमधील आमच्या ग्राहकांना विशेष सवलतीसह त्यांची आवडती दुचाकी घरी घेऊन जाता येईल’, महिंद्र दुचाकी विक्री, विपणन, उत्पादनचे वरिष्ठ व्यवस्थापक नवीन मल्होत्रा यांनी सांगितले.