मालाड, ता.26(वार्ताहर) : वांद्रे पश्चिम येथील सेंट तेरेसा शाळेत भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेतील वरिष्ठ लिपिक नरेश राठोड सर जे जुलै 2022 मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत, त्यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. तर नुकतीच 25 वर्ष सेवा पूर्ण केलेल्या सर गणेश हिरवे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. राज्यघटनेने जे हक्क व अधिकार आपल्या प्रत्येकाला दिले आहेत त्याचा उपयोग आपण चांगल्या कामासाठी केला पाहिजे असे हिरवे सरांनी आपल्या भाषणात सांगितले तर जगात चार प्रकारची लोक असतात, काही नियमानुसार काम करतात, काहीजण चांगल व प्रामाणिकपणे काम करतात, काहीजण केवळ दिखावा करतात,तर काहीजण काहीच करत नाहीत व केवळ टंगळमंगळ करतात तेव्हा आपण कोणत्या प्रकारात मोडतो. हे ज्याने त्याने ठरवून काम करायला हवं व जे प्रामाणिकपणे काम करतात. त्यांचा जयजयकार नेहमीच लोक करत असतात व विश्वासाने त्यांच नाव घेतात असे शाळेचे मुख्याध्यापक फादर निकी यांनी आपल्या भाषणात सांगितले. शाळेतील महिला शिक्षक वृंदाने यावेळी देशभक्तीपर गाणी म्हटली,तर टीचर शरून यांनी आभार प्रदर्शन केले. सुत्रसंचलन सर शैलेश पांडे यांनी केले,कोविड नियमांचे पालन करून कार्यक्रम घेण्यात आला. शेवटी अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.