मुंबई, (निसार अली) : मालाडमधील कुरार व्हीलेज येथे असणार्या नुतन विद्या मंदिर शाळेच्या कला मंदिरात संत शिरोमणी रोहिदास यांची जयंती मराठवाडा रोहिदास मित्र मंडळाने उत्साहात साजरी केली. यावेळी श्री रवी गोपीनाथ गाडे महाराज (पुणे) यांची प्रमुख उपस्थिती होती. संत रोहिदास यांच्या समता मूलक विचारांवर अधारित मते यावेळी व्यक्त करण्यात आली.
संत रोहिदासांचे विचार सर्वांना समजणे आवश्य्क आहे, याकरिता त्यांच्या विचारांचा उत्सव साजरा करत आहोत, असे मंडळांचे अध्यक्ष मंगेश वाघमारे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबुराव माने होते, सुत्रसंचालन दत्तु काजळे यांनीं केले. कार्यक्रमासाठी ,विष्णु भैया खोडवेकर, अमूल वाघमारे महाराज, ज्ञानदेव वर्पे, अँड .नारायण गायकवाड, लेखक सुर्यकांत कदम, चंद्रकांत पातील , सुनिल गायकवाड, संजय खरात आदी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.