मुंबई : सैनिक फेडरेशनच्या वतीने 26 जुलै 2022 रोजी संपूर्ण राज्यात कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी हुतात्मा सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच सैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. मुंबई आणि नवी मुंबई येथेही कार्यक्रम झाले. सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यावेळी उपस्थित होते.
सैनिक फेडरेशनच्या व सैनिकांच्या विविध संघटनाच्या संपूर्ण कार्यकारिणीने वेगवेगळे कार्यक्रम यानिमित्त राबवले. त्याबद्दल सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सर्व संघटनांचे व सर्व सैनिक फेडरेशन पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
येत्या काळामध्ये येणाऱ्या अमृत महोत्सव दिनानिमित्त 1971 च्या युद्धातील शहिदांना श्रद्धांजली देणार आहोत. त्याकरिता सर्व सैनिक फेडरेशनच्या जिल्हाध्यक्ष, विभागीय अध्यक्ष, महिला ब्रिगेड, महिला ब्रिगेडचे पदाधिकारी त्याचप्रमाणे सर्व संघटना सैनिक फेडरेशनसोबत काम करत आहेत. त्या सर्वांना मिळून अमृत महोत्सव 1971 च्या युद्धाची सुवर्ण जयंती आपण सैनिक फेडरेशनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयोजित करणार आहोत. या कार्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून यशस्वी करालच. सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या आदेशानुसार सैनिक मित्र व समाजातील चांगले कार्य करणारे कार्यकर्ते सैनिक फेडरेशन सोबत जोडून त्यांच्या माध्यमातून आपण सैनिक अमृत महोत्सव हा कार्यक्रम यशस्वी करूया, असे डीएफ निंबाळकर सैनिक फेडरेशन जनरल सेक्रेटरी सैनिक फेडरेशन यांनी सांगितले. यावेळी सुभाष दरेकर सैनिक फेडरेशन उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, अरविंद गव्हाणकर कोर कमिटी सदस्य, फेडरेशनचे
सहसचिव माजी सैनिक श्रीधर टक्केकर, सुरक्षा घोसाळकर तसेच भारतीय माजी सैनिक संघटना मुंबई पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन शत्रुघ्न महामुनकर सचिव सैनिक फेडरेशन मुंबई जिल्हा यांनी केले होते.