मुंबई, (निसार अली) : भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभुषण जाधव यांना पाकिस्तान सरकारने फाशीची शिक्षा जाहीर केली आहे. या शिक्षेच्या निषेधार्थ आणि जाधव यांना समर्थन देण्यासाठी कांदिवली पश्चिमेतील सह्याद्री डी २ या सार्वजनिक उत्सव मंडळाने उपोषण केले. यावेळी पाकिस्तानचा निषेध देखील करण्यात आला.
पाकिस्तान ने केलेल्या भ्याड हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली. सह्याद्री डी २ सार्वजनिक उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी सभासद व रहिवाशांनी उपोषणात सहभाग घेतला, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष रोहिदास चिकणे व सहसचिव घनश्याम देटके यांनी दिली