
मुंबई : सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज सहकार आणि पणन विभागाचा कार्यभार स्वीकारला.
मंत्रालयात दालन क्र. 241 (विस्तार) हे त्यांचे कार्यालय आहे. यावेळी आमदार संग्राम थोपटे,भारत भालके संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, सहकार मंत्री म्हणून माझ्यावर मोठी जबाबदारी देऊन जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून चिंतामुक्त करण्यासाठी हे शासन काम करेल. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेवून शेतकऱ्यांच्या विकासासाठी महत्वाचे निर्णय घेतले जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
















