
उदघाटन सोहळ्यात घुमला ‘विठु माऊली’चा जयघोष
चिपळूण : तालुक्यातील मांडकी-पालवण येथील कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यातील पहिल्या ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात विठु माऊली’चा जयघोष पाहायला मिळाला.

साहित्यिक विचारांनी भारलेल्या या सोहळ्यात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विठु माऊली’च्या जयघोषात सादर केलेल्या माऊली नृत्याने जणू साहित्य संमेलनात पंढरीच अवतरली होती, त्यामुळे उपस्थितांनीही या नृत्याला चांगली साद दिली..















