सायन : येथील पदमश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ भिवंडी संचालित ज्ञान विंकासनाईट हायस्कूल चा दहावी च्या विध्यार्थांचा सांगता समारंभ दिनांक २४ फेब्रुवारी २0१८ रोजी आनंदात व उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक भिमराव परदेशी, प्रमुख पाहुणे पाटील सर स्वामी शामानंद हायस्कूल घाटकोपर व न्यू होप फाऊंडेशन च्या उपाध्यक्षा सौ अनुराधा बिंगी,मिलिंद मोरे उपस्थित होते. दिवसा काम करून, कुटुंबिक जबाबदारी सांभाळून हे विद्यार्थी रात्र शाळेत शिक्षण घेत असतात.त्यांची शिक्षा घेण्याची जिद्द पाहून १९६८ पासून सायन येथे पदमश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ भिवंडी संचालित ज्ञान विंकासनाईट हायस्कूल आपले कार्य यशस्वीपणे पार पडत आहे.ज्या प्रमाणे चिमणी आपल्या पिल्लांना अन्नाचे एक एक कण आणून भरविते व आकाशात उंच भरारी घेण्यासाठी त्यांच्या पंखात बळ निर्माण करते. या उक्तीप्रमाणे खडतर परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या कष्टाळू व होतकरु विद्यार्थ्यांना ज्ञानरूपी अन्नाचे कण प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या देऊन भावी जीवनासाठी सज्ज केले. शाळेचे मुख्याध्यापक परदेशी सर मार्गदर्शन करताना म्हणाले कि, ” हि शालान्त परिक्षा आयुष्यात यशस्वी इ पहिली पायरी असून भविष्यात जीवन अ संस्थेचे व शालेय जीवनातील अनुभवांचे प्रतिबिब तुमच्या बोलण्यातून दिसायला हवी. हि तुमच्या जीवनाची शिदोरी आहे. याच शिदोरीचा वापर तुम्हाला भावी आयुष्यात होणार आहे.शालान्त परीक्षा तसेच कोणत्याही स्पर्धात्मकपरीक्षेला सामोरे जाताना आत्मविश्वासा ने जा यश तुमचेच आहे असे प्रमुख पाहुणे न्यू होप फाऊंडेशन च्या उपाध्यक्षा सौ अनुराधा बिंगी यांनी या वेळी मुलांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
सायन येथील ज्ञानविकास रात्र शाळेच्या दहावी च्या विध्यार्थांचा सदिच्छा समारंभ
शिक्षण घेताना आलेले अनुभव सांगून रात्र शाळे विषयी ऋण व्यक्त केले.इतर विध्यार्थानीही हि रात्र शाळेत शिक्षण घेताना आलेले अनुभव सांगितले. या कार्यक्रमाला शाळेतील सह शिक्षिका सौ.ठाकूर व सौ केंद्रे या उपस्थित होत्या. सदिच्छा समारंभात शाळेचे माजी विध्यार्थी देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह शिक्षिका खिलौनी राऊलकर यांनी केले.