नवी दिल्ली : रशिया भारताच्या सर्वात विश्वासू मित्रांपैकी एक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केेले. मॉस्कोमध्ये त्यांनी भारतीय समुदायाची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
सुरक्षा, दहशतवाद आणि कट्टरतेविरुद्ध उपाययोजना, अंमली पदार्थ तस्करी आणि बनावट चलनरोधन उपाय, माहितीची देवाणघेवाण अशा क्षेत्रात दोन्ही देशांमधले सहकार्य वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने ही भेट फलदायी ठरली असल्याचे ते म्हणाले.
रशियात राहणारे भारतीय करत असलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. रशियात राहणारे भारतीय भारताचे सांस्कृतिक दूत आहेत असे ते म्हणाले.
भारत सरकारच्या गेल्या काही वर्षातल्या कामगिरीबाबत माहितीही सिंह यांनी यावेळी दिली. आपल्या रशिया दौऱ्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले