रत्नागिरी दि. ४: पॅरालंपिक कमिटी ऑफ इंडिया वबॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया यांचे संयुक्त विद्यमाने ४ थी राष्ट्रीयपॅरा बॅडमिंटन स्पर्धा भुवनेश्वर, ओडिसा येथे २४ डिसेंबर २०२१ ते २६ डिसेंबर २०२१ या कालावधीत संपन्न झाली.
या स्पर्धेमध्ये तालुका क्रिडा अधिकारी रुही शिंगाडे यांनी महाराष्ट्रातर्फे एस एस ६ यागटामध्ये महिला एकेरी व महिला दुहेरी या प्रकारात सहाभाग घेऊन दोन रौप्य पदकांची कमाई करून महाराष्ट्राचा नाव लौकिक वाढविला आहे. या स्पर्धेमध्ये २५ राज्यातील ५०० च्या वर स्पर्धक सहभागी झाले होते.
रुही शिंगाडे या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे तालुका क्रीडा अधिकारी (गट -ब) या पदावर कार्यरत आहे. सदर स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फात किरण बोरवडेकर तसेच इतर अधिकारी /कर्मचारी यांच्या मार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढीलवाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात आल्या.













