
मुंबई – प्रभादेवी येथील सिध्दीविनायक मंदिरात विश्वस्त आरतीताई साळवी यांच्या सहकार्याने सदिच्छा भेटीचे आयोजन रूग्ण मित्रांसाठी करण्यात आले होते.
तद्प्रसंगी सिध्दीविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर,विश्वस्त सुनीलजी गिरी व राजारामजी देशमुख यांची भेट झाली.मंदिरामार्फत वैद्यकीय मदत,पुस्तक पेढी इ.सारखे कल्याणकारी उपक्रम राबविण्यात येत असून,जास्तीत जास्त लोकांनी त्याचा लाभ घ्यावा व गरजूंपर्यंत मदत पोहचावी असे न्यासाचे अध्यक्ष व विश्वस्त यांचेकडून सूचना तथा मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच नमुना अर्ज व वेबसाइट लिंक याच्या प्रती देण्यात आल्या.रूग्ण मित्र विनोद साडविलकर,नरेश मोरे,श्रीविद्या सरवणकर,आनंद साबळे,नितीन शिंदे,दिनेश बैरीशेट्टी,नवीनकुमार पांचाळ,वसंत सुतार,श्रेया सप्रे,दिनेश गोसावी,जयकिसन डुलगच,अनिल यादव,श्रध्दा अष्टीवकर,प्रज्वला इंगळे,रमेश चव्हाण,डाॅ.अलका थरवळ,डाॅ.कल्पना देसाई इ.संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.रूग्ण मित्रांनी न्यासाचे अध्यक्ष व विश्वस्त यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान केला.न्यासाचे अध्यक्ष व विश्वस्त यांच्या वतीने रूग्ण मित्रांना दर्शन, प्रसाद व मंदिर गाभा-यात यथोचित सन्मान करण्यात आला.
रूग्ण मित्र नरेश मोरे यांनी सदरची सदिच्छा भेट घडवून आणली.मंदिर व्यवस्थापनाचे कर्मचारी यांनी उत्तम सहकार्य केले.















