मुंबई : राज्यातील वाढत असलेले रस्ते अपघात रोखण्यासंदर्भात मुंबई मध्य प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने महावॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या महावॉकेथॉनमध्ये अपघात टाळण्यासाठी जनजागृती करण्यात आली. हे वॉकेथॉन मुंबई मध्य प्रादेशिक परिवहन कार्यालय ते महालक्ष्मी रेस कोर्सपर्यंत आयोजित करण्यात आले होते.रस्ते अपघात कमी करणे तसेच योग्य त्या उपाययोजना करून रस्ते अपघात कसे टाळता येतील, याबाबतची माहिती वॉकेथॉनद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करण्यात आले. या वॉकेथॉनमध्ये मुंबई मध्य प्रादेशिक परिवहन अधिकारी सुभाष पेडमकर, उपक्षेत्रीय वाहतूक अधिकारी श्री. कामत, परिवहन निरीक्षक, टॅक्सी चालक यांनी सहभाग घेतला.