
नौका बंदरात
वादळाचा संदेश आल्यानंतर मच्छीमारांची एकच धावपळ उडाली. १५ मे व १६ मे दरम्यान वादळ रत्नागिरी जिल्ह्याकडे सरकण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून मच्छिमारांना व किनारपट्टीलगत राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा संदेश देण्यात आला होता. तसेच मच्छीमारांनी सुरक्षिततेसाठी ठिकठिकाणच्या बंदरांचा आसरा घेतला आहे. जिल्ह्यातील प्रमुख बंदरांवर सध्या मासेमारी नौकांनी गर्दी केली आहे. वादळाच्या सतर्कतेचा संदेश मिळाल्याने हर्णे बंदरातील नौकांनी आंजर्ले, जयगड, दाभोळ (रत्नागिरी), दिघी(रायगड) खाडीत तसेच मिरकरवाडा व अन्य बंदरात आसरा घेतला आहे. रत्नागिरीतील नौकांनी देखील सुरक्षिततेसाठी बंदरातच राहणे पसंत केले आहे. मिरकरवाडा बंदरात जवळपास 500 नौका सुरक्षित करून ठेवण्यात आल्या आहेत.