
रत्नागिरी, (आरकेजी) : विविध प्रलंबित मागण्यांसाठी रत्नागिरी नगर परिषदेच्या कर्मचार्यांनी आज एक दिवसाचे सामूहिक रजा आंदोलन केले. त्यामुळे नगर परिषदेचे सर्वच कामकाज ठप्प झाले होते.
महाराष्ट्र राज्य नगरपालिका, नगरपंचायत, मुख्याधिकारी, कर्मचारी व संवर्ग कर्मचारी कामगार संघटना समितीच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून आज रत्नागिरी नगर परिषदेसह सामूहिक रजा आंदोलन संपूर्ण राज्यात करण्यात आले.
या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणजे १० ते १४ ऑगस्ट पर्यंत शासनाचा निषेध म्हणून काळय़ा फिती लावून काम करण्यात येणार आहे. तर १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहणानंतर पालकमंत्री, खासदार आणि आमदार यांना निवेदन देण्यात येणार आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास २१ ऑगस्टपासून बेमूदत काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.