रत्नागिरी, (आरकेजी) : शेतकरी संपाच्या सहाव्या दिवशी रत्नागिरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार आज सुरळीत सुरु होते. परंतु कांदा बटाट्याची आवक ठप्प झाली होती तर पंधरा टन भाज्यांची आवक बाजार समितीमध्ये झाली. टाॅमेटोचे दर मात्र आज उतरले.
सोमवारच्या महाराष्ट्र बंदमुळे जिल्ह्यात आज भाज्यांची आवक होणार की नाही, याची चिंता व्यापार्यांना होती. आज मुंबई (वाशी मार्केट), कराड, कोल्हापूरातून भाज्यांचे ट्रक रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाले. पश्चिम महाराष्ट्रात कांदा बटाट्याचे लिलाव झाले नसल्याने रत्नागिरीत त्यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे आवक ठप्प होऊन कांदे बटाट्याचे दर कडाडले आहेत. स्थानिक बाजारातही भाज्यांचे दर चढेच राहिले आहेत. बाजार समितीत १५ लाखांंच्या भाज्यांचे आज लिलाव झाले.
रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजारातील भाज्यांचे दर (घाऊक दर)