चक्रीवादळानंतर पंचनाम्याचे काम सुरू
रत्नागिरी, प्रतिनिधी : तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात 1028 घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. रत्नागिरी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने ही माहिती दिली आहे.
मंडणगड तालुक्यात 200 घरांचे, दापोली तालुक्यात 350 घरे, खेड तालुक्यात 30 घरांचे, गुहागर 05 घरे, चिपळूण 65 घरे, संगमेश्वर 102 घरे, रत्नागिरी 200 घरे, राजापूर 32 असे एकूण जिल्ह्यात 1028 घरांचे तर रत्नागिरीमध्ये 1, लांजामध्ये 1 आणि राजापूरमध्ये 05 असे एकूण 07 गोठ्यांचे नुकसान झाले आहे. या चक्रीवादळामध्ये गुहागर येथे 1, संगमेश्वर येथे 1, रत्नागिरीमध्ये 03 आणि राजापूरमध्ये 03 असे एकूण 08 व्यक्ती जखमी झाल्या असून गुहागरमध्ये 1 बैल, संगमेश्वर मध्ये 01 बैल आणि रत्नागिरीमध्ये 2 शेळ्या असे 4 पशुधन मृत झाले आहेत. जिल्ह्यामध्ये 450 झाडांची पडझड झाली असून 14 दुकाने व टपऱ्यांचे 09 शाळांचे तर 21 शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे.
वादळामुळे राजापूर तालुक्यात 652 व्यक्ती, रत्नागिरी तालुका 363, दापोली तालुका 2373, मंडणगड तालुका 508, गुहागर तालुका 667 असे एकूण 4563 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले. सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार कोणत्याही मच्छिमार बोटी समुद्रात गेलेल्या नाहीत सर्व बोटी किनाऱ्यावर आहेत.
सदरचा अंदाज हा प्राथमिक स्वरुपाचा असून 17 मे 2021 रोजी पासून संबंधित तहसिलदारांमार्फत प्रत्यक्ष पंचानाम्याला सुरुवात करण्यात आली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
*चक्री वादळ, वीज पुरवठा गोषवारा*
रत्नागिरी जिल्ह्यातील चक्रीवादळ परिस्थिती मुळे वीज प्रणाली बाधित झाली त्याचा दिनाक 17 मे दुपारी 3 वाजता गोषवारा.
1 एकूण गावे 1239 पैकी 760 बंद 479 सुरू
2 एकूण उपकेंद्रे 55 पैकी 27 सुरू 28 बंद
3. ट्रान्सफॉर्मर 7548 पैकी 1883 सुरू 5665 सुरू होणे बाकी
4. एकूण वीज कनेक्शन 545120 पैकी 187711 सुरू 357409 सुरू होणे बाकी
5. HT पोल 164 बाधित
6. LT पोल 391 बाधित
7. HT लाईन नादुरुस्त 49 किलोमीटर
8. LT लाईन नादुरुस्त 117 किलोमीटर
9. ट्रान्सफॉर्मर 15 नादुरुस्त.
10. मनुष्यबळ, कंपनी चे 71 माणसे 910, कंत्राटी 33 टीम माणसे 304