रत्नागिरी, प्रतिनिधी : रत्नागिरी शहरातील मिस्त्री हायस्कूल येथे लसीकरणासाठी झालेल्या चेंगराचेंगरी प्रकारानंतर आता प्रशासनाने 45 वर्षांवरील लसीकरण देखील ऑनलाइन पध्दतीनेच होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता 45 वर्षांवरील शहरी भागातील लोकांना ऑनलाइनद्वारेच बुकिंग करून लसीकरणासाठी जावे लागणार आहे.
आज 13 मे रोजी या वयोगटातील नागरिकांना कोविडशिल्ड लसीकरण जिल्ह्dयातील 14 केंद्रावर सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार आहे. पूर्वी 45 वर्षांवरील वयोगटासाठी कोरोना लसीकरणाच्या दुसऱया मात्रेसाठी ऑफलाईन लसीकरण केले जात होते. पण सोमवारी रत्नागिरीत मिस्त्री हायस्कूल येथील लसीकरण केंद्रावर घडल्या पकाराची गंभीर दखल घेण्यात आली आहे. यापुढे लस घेण्यासाठी लाभार्थींनी कोवीन पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करूनच आपाँईंटमेंट घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.