
मालाड,ता.4(वार्ताहर): पर्यावरणाचे संरक्षण व्हावे आणि पहिल्या पावसात जमिनीत फळ झाडाची लागवड व्हावी म्हणून राष्ट्र सेवा दल मालवणी मालाड केंद्राने आज ‘ सीड बॉल ‘ तयार करण्याची कार्यशाळा आयोजित केली होती.
मालवणी येथील राष्ट्र सेवा दलाचे निसार अली सय्यद, मनोज परमार, नमिता मिश्रा, मेरी चेट्टी, वैशाली महाडिक आदीच्या पुढाकाराने आज दुपारी २ ते ५ या वेळेत या कार्यशाळेचे आयोजन केले होते. आंबा,सीताफळ,जांभूळ,आदी फळबिया जमा करून मातीच्या साह्याने हजार सीड बॉल तयार करण्यात आलेले आहे. पहिल्या पावसात आरे कॉलनी,संजय गांधी उद्यान येथे हे सीड बॉल चे रोपण केले जाईल.
आजच्या या कार्यशाळेत राष्ट्र सेवा दल आणि सफल विकास वेल्फेअर सोसायटीचे अशोक शिंदे,मनोज खराडे,कृष्णा वाघमारे, सुजल मिश्रा,वसीम मुजावर,हयात मुजावर,शुभम मिश्रा,विक्रम घोरपडे, उत्कर्ष बोरले, ईश्वर,ज्योती बामगुडे.आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.















