
मुंबई, (निसार अली) : देशातील उद्योग टिकला तरच कामगार टिकेल. कामगारांचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर असेन, असे प्रतिपादन कामगार नेते, आमदार भाई जगताप यांनी बेलार्ड पिअर येथील रॉयल बॉम्बे सीमेन्स क्लब येथील कामगारांच्या वेतनवाढीचा करार करताना केले. नुकताच हा करार करण्यात आला.
सध्या देशातील युवकांसमोर मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न उभा आहे. अनेक उद्योग चुकीच्या धोरणामुळे बंद पडत असून काही कंपन्या महाराष्ट्र राज्याबाहेर चालल्या आहेत. आमच्या कामगार युनियनला 33 वर्षे झाली असून आम्ही एकही कंपनी बंद पडू दिली नाही. तर अनेक कंत्राटी कर्मचारी यांना कायमस्वरुपी केले, असे भाई जगताप म्हणाले.
पगरवाढीच्या करारावर मॅनेजमेंट आणि कामगार यांच्या प्रतिनिधींनी स्वाक्षरी केल्यावर कर्मचाऱ्यांनी आमदार भाई जगताप यांचे आभार मानले. या कार्यक्रमात भारतीय कर्मचारी महासंघाचे सचिव प्रकाश शिंदे, सीमेन्स क्लबचे कर्मचारी प्रफुल्ल तांबे, उत्तम पवार, महासंघाचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण मंत्री, अजय सुर्वे, व्यवस्थापन समिती आणि असंख्य कर्मचारी उपस्थित होते.














