मुंबई : कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नागरी उपजिविका अभियान यांच्यावतीने गुरुवार १९ जुलै रोजी मुलुंड येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), नवीन इमारत, मिठागर रोड, मुलुंड पूर्व येथे सकाळी ८ ते दुपारी४ वाजेपर्यंत भरणार आहे.मेळाव्यात अल्पशिक्षित, दहावी, बारावी पास आणि नापास, पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले, आयटीआय येथून प्लंबर, इलेक्ट्रीशिअन, एअर कडिंशनिंग, रेफ्रीजरेशन रिपेंरिग क्षेत्रात प्रशिक्षण घेतलेल्या १८ ते ३५ वयोगटातील कुशल, अकुशल, दिव्यांग युवक आणि युवती यांनी या रोजगार मेळाव्याला उपस्थित राहावे. हॉटेल, रेस्टाँरंट, पर्यटन, हाऊस किपींग, फॅसिलिटी मॅनेजमेंट, क्रूझ लाईन या क्षेत्रातील आकर्षक वेतनाच्या रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. युवक आणि युवतींनी या रोजगार मेळाव्याला येताना त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, मार्कशिट आणि शाळेचा दाखला सोबत आणावा असे आवाहन कौशल्य विकास विभागामार्फत करण्यात आले आहे.