रोडपाली : रोडपाली कोळीवाडा जेट्टी येथे कोळी समाज मच्छिमार कृती समिती च्या वतीने नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात उपस्थितांच्या हस्ते दर्याला नारळ अर्पण करण्यात आला. त्यांना कोळी समाज महिला बचत गटातील महिलांनी बांबू पासून बनविलेल्या होड्या आणि कापडी पिशव्या भेट दिल्या.
यावेळी कळंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चव्हाण साहेब, पनवेल महानगरपालिका आरोग्य अधिकारी अरुण कांबळे साहेब,सिडको चे कार्यकारी अभियंता विलास बनकर साहेब,डॉ.अशोक म्हात्रे साहेब -महाराष्ट्र राज्य पत्रकार उत्कर्ष समिती, नगरसेवक अरविंददादा म्हात्रे, मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड चे व्यवस्थापक सोमनाथ मालगर, अभिजितदादा पाटील -पनवेल काँग्रेस अध्यक्ष, सुदामदादा पाटील-महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस जीवनभाई गायकवाड-रिपब्लिकन सेना रायगड जिल्हा अध्यक्ष,अनिल नाईक -समाजवादी पार्टी रायगड जिल्हा अध्यक्ष,गोविंद जोशी संपादक तसेच समितीचे मार्गदर्शक आत्माराम कदम साहेब सल्लागार सुनील भोईर साहेब व रोडपाली पंचक्रोशीतील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.