डोंबिवली : डोंबिवलीतील ‘इंडो अमाइन्सचे मालक व प्रसिद्ध उद्योजक विजय पालकर घरात झोपलेले असताना त्याच्या डोंबिवली निवासी भागातील बंगल्यावर धाडसी दरोडा टाकण्यात आला. दरोड्यात लाखो रुपयांचे सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज लंपास करण्यात आला आहे. विशेष म्हणजे विजय पालकर व त्याची पत्नी भारती घरात झोपलेले असताना पहाटे सव्वाचारच्या सुमारास ही घटना घडली असून डोबिवलीतील कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे दिसत आहे.
विजय पालकर व त्याची पत्नी मंगळवारी रात्री मुंबईहून साडेबाराचे सुमारास आले व ते त्याच्या बेडरुमध्ये झोपले, पहाटे ते उठले असतना त्याना सर्व सामान अस्तव्यस्त पडलेले दिसले. त्यानी पहिल्या व दुसऱ्या मज्ल्यावर धाव घेतली असता सर्व कपाटे फोडून रोख रक्कम, सोने चांदीचे दागिने असा मोठा ऐवज चोरीला केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानी बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या कर्मचाऱ्याला हाक मारली तर तो काही येईना म्हणून ते बघायला गेले असता त्याच्या खोलीला बाहेरुन कडी लावलेली दिसली. घरात पाळलेले कुत्रे असून त्याचाही आवाज आला नाही व जे सी.सी.टी.व्ही. लावले आहेत ते सर्व फोडून त्यांची दिशा बदलून ठेवल्याचे दिसून आले. त्यानी तातडीने मानपाडा पोलीस ठाण्यात फोनवर कळवले तेव्हा पोलीसांचे पथक घटनास्थळी आले. बंगल्याच्या बाहेर दरोड्यासाठी वापरलेली कटावणे, पहार, चाकू आदी साहित्य पडल्याचे दिसून आले पोलीसांनी सर्व सामान जप्त केले आहे.